Friday, August 7, 2009

Rain

written by swapnil

The first sprinkles of the rain,
the first smell of the water soaked soil
the first drop on the hands
recalling first memories of the first love

the yellow dim light of the lamp-post
the tree that tangled with it
the man sleeping on the bench
and the cat sleeping besides his feet

the roads are empty and mens are few
on the otherside of this night it would be different
the roads will be few and mens are empty
the few roads carrying the empty minds......

So I want to enjoy this moment
dont want to care about the otherside
although its night and it quarter past three
no one is awake... just raju and me....

साडेसातचा गजर

साडेसातचा गजर, snooze च बटन
मग ती धावपळ, कोंबलेला शर्ट अन तोड्लेला सिग्नल !!!
जिममधल्या मुली, त्यांची परफेक्ट फिगर
वाढवलेली एक प्लेट, अन् त्यामुळे येणारी प्रचंड कळ !!!
रोजचीच मीटिंग, रोजचेच भाषण
design change अन पुन्हा नव्याने discussion !!
साडे बाराचा पिंग, cafetaria की yummy tummy
तेच चेहरे, तेच जेवण, पण दरवेळेस party चे मात्र वेगळे reason !!
पेंगाळ्लेले डोळे, coffee ची ती वाफ
जुने पुराने जोक्स, नविन माणसांमध्ये मिसळण
भयानक traffic , पावसाच बरसण,
ओले रस्ते, पुढे जाणारया बाईकरला दिलेली ठसन !!
घरचा ठरलेला फोन, त्याच मित्रांचे sms
मग काही आठवन, एकट्याशीच हसण !!
पुन्हा बुधवार, पुन्हा तीच मेस
aunty च रड्गार्‍हाण, अन् गरमागरम वरण !!
carrom मधल हरण, friends मिळून बघण,
laptop मधली डोकी, नवीन काही सापडण
मग ते शेअर करण, अन् जोरजोरात खिदळण !!!
observer, marketing, लिखाण की पुस्तक वाचन,
नुसता गोंधळ नुसते confusion , स्वतला शोधयचा एक प्रयत्न !!
शेअर केलेला बेड, अन त्यावर न येणारी झोप,
तेच ते विचार, अन तिच ते नसण,
आणि मग,
पुन्हा एकदा नवीन स्वप्न, पुन्हा एकदा साडेसातचा गजर !!!

Long Nights

- written by swapnil



reddish eyes, empty roads
on iPod, 'long nights'

defects, cases, blurred vision
lipton, nescafe or fusion

avert, meet,dissimulated expression
Laughing, teasing and frustration

500 or more, still lonely plate
insipid food, sapid water and me fret

tangent look, wan smiles
lifeless talks, bruised emotions

dim lights, fading sun
suffocating cubicles, smothering pun

gathering clouds, dusty breeze
sprinkle of rain, dampish street

Avoiding somebody, avoided by somebody
Window seat, and bag next to me

norah jones on crowded roads
laughing crying and with many moods....

Flashcards, barrons,
and iPod singing and waiting for 'long nights'

Saturday, June 6, 2009

पत्त्यातल्या राजाची गोष्ट

पत्त्यामधले राजा राणी
आयुष्याचा खेळ
मजेत खेळत असतात

कधीतरी काय होतं,
राजा हरवतो...
मग कुठल्यातरी पत्त्याला राजा बनवलं जातं
पण राणीला तो खोटा राजा नाही आवडत...
ती खेळ खेळत राहते
मजेत...
पण... गुलामासोबत...

आणि कधीतरी...
राजा नाही, राणी हरवते
पून्हा कुठल्यातरी
दूरी नाहीतर तीरीला
राणी बनवलं जातं
राजालाही ते नाही आवडत...
पण राणीसारखा त्याला
दूसरा पर्याय नसतो...
त्याला त्याच खोट्या राणीसोबत
खेळत रहावं लागतं

मग चौकट असो, किलवर असो
इस्पिक अथवा बदाम
राजा राहतो जगत उदास उदास...
पत्त्यांच्या एका कोपर्‍यात...
स्वतःच हरवेपर्यंत !

जगदिश

जायचे होते तुला तर....

जायचे होते तुला तर थांबुनी वळलीस का?
उंबरा ओलांडताना नेमकी अडलीस का?

वार तू करता विखारी, शब्दही भांभावले
माझिया प्रश्नांवरी मग मौन तू बसलीस का?

तू निरोपाला हसोनी मानले मजला खूळे
पाठमोरी होउनी मग आसवे टिपलीस का?

एकदा तू सांग माझ्या पाहुनी डोळ्यांमधे
एवढे मी बोलता तू लोचने मिटलीस का?

घेतले माझ्या वसंताला जरी तू सोबती
पानगळ शिशिरातली झाल्यापरी झडलीस का?

जगदिश

वायदे...

वायदे करती हजारो पाळणारे शोधतो
माणसाला माणसागत मानणारे शोधतो

बोलणारे भेटले अन् ऐकणारे भेटले
बोलल्याविण या मनीचे जाणणारे शोधतो

दोन शोधा चार मिळती सूख असता सोबती
दु:खही दिसता जरासे थांबणारे शोधतो

बाह्यरुपाला बघोनी लायकी ठरते जिथे
कातडीच्या आतलेही पाहणारे शोधतो

जाहल्या जखमा कहाण्या यातना झाल्या जुन्या
मी नव्याने घाव आता घालणारे शोधतो

नीज येता पाहणे स्वप्ने सुखाने रोजचे
घेउनी स्वप्ने उराशी जागणारे शोधतो

अंत येता ढाळण्याला आसवे कोणी नको
आज मी पार्थिव माझे जाळणारे शोधतो

जगदिश

सुख...

" आनंद जगण्यात चिक्कार झाला
सदा हासणे एक उपचार झाला
जरा दू:खही दे मला ईश्वरा रे
सुखाने अता जीव बेजार झाला "

एवढं लिहिलं
आणि स्वप्नातनं जाग आली ...
पून्हा झोपी जाताना
उशी तेवढी उलटी केली
भिजलेली !

जगदिश